वाहतूक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वेंगुर्लेकर यांचा नवी मुंबई येथे सत्कार

वाहतूक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वेंगुर्लेकर यांचा नवी मुंबई येथे सत्कार


नवी मुंबई 


        महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली नेमणूकीतील पोलीस हेड कॉस्टेबल सुनील दत्ताराम वेंगुर्लेकर यांनी 36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत केलेल्या कारवाई बद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा महामार्ग पोलीस मदत केंद्र, पळस्पे, नवीमुंबई येथे सत्कार करण्यात आला.त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीकरीता महाराष्ट्र राज्य पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडून त्यांची निवड करण्यात आली असून त्यांना महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील आयोजित रस्ता सुरक्षा अभियान-2025 कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक डॉ सुरेश कुमार मेकला यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीप्रत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस उप अधीक्षक  श्रीम. ज्योत्स्ना रासम, म.सु.प. रत्नागिरी विभाग, पोलीस निरीक्षक श्रीम. दिपाली जाधव यांच्या उपस्थितीत तसेच महामार्ग पोलीस केंद्र कसाल, हातखंबा, चिपळूण, कशेडी, वाकण, महाड, बोरघाट, पळस्पे, या पोलीस मदत केंद्रांकडील प्रभारी पोलीस अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.