सावंतवाडी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांचे शिवसेना उबाठा पक्षाकडून स्वागत

सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पाटील यांच्याशी शहरात होत असलेले रस्ते तसेच पाणीटंचाई यासारख्या अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, शहर प्रमुख शैलेश गौंडळकर, युवा पदाधिकारी आशिष सुभेदार, ग्राहक संरक्षणकक्ष शहर प्रमुख अजित सांगेलकर, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष जावेद शेख, रश्मी माळवदे, समीरा खलील आदी पदाधिकारी उपस्थित होते.