कुडाळ येथील नेरूर गावात आढळला दुर्मीळ ॲटलंस माॅथ पतंग

कुडाळ
सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघोसेवाडी येथे ॲटलंस माॅथ नावाचा अतिशय दुर्मीळ पतंग जातीचा फुलपाखरु आढळून आला आहे. निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना हा पतंग दिसून आला. आशियातील जंगलामध्ये आढळणारा हा एक मोठा सॅचुरनिड पतंग आहे. हा पतंग 12 इंच एवढा मोठा असून पंखाच्या वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा आहे. या पतंगाचे आयुर्मान कमी असल्यामुळे हे पतंग दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात. हा बहुतेक वेळा दक्षिण भारत व श्रीलंकेत आढळून येतो. मात्र हा कुडाळ नेरूर गावात आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.