झोळंबे गावात आढळला दुर्मिळ 'फ्लायिंग स्नेक'
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावात २ फूट लांबीचा दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला. सर्पमित्र विठ्ठल गवस यांनी त्याची छायाचित्रे टिपली. नंतर त्यांनी सापाला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले. या घटनेमुळे परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.सोनसर्प हा अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा साप असून, त्याला "फ्लायिंग स्नेक" म्हणूनही ओळखले जाते. झाडावरून झाडावर उडण्याची त्याची क्षमता विशेष मानली जाते. या घटनेमुळे परिसरात वन्यजीव प्रेमींत मोठी चर्चा रंगली आहे.

konkansamwad 
