दशावतार, भजन आणि दांडिया!.....आंबडपालच्या गिरामाऊली मंदिरात रंगणार भव्य नवरात्रौत्सव

दशावतार, भजन आणि दांडिया!.....आंबडपालच्या गिरामाऊली मंदिरात रंगणार भव्य नवरात्रौत्सव

कुडाळ


 आंबडपाल येथील नाईकवाडीस्थित श्री देवी गिरामाऊली मंदिरात यंदाचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या दहा दिवसांच्या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक आरती, भजन, फुगडी, दांडिया, लहान मुलांचे खेळ व दशावतारी नाट्याची भव्य मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. उत्सवाची सुरुवात ११ ऑक्टोबरला सायंकाळी ७:३० वाजता महाआरतीने होईल. त्यानंतर सायंकाळी ८:०० वाजता श्री देवी गिरामाऊली प्रासादिक भजन मंडळ (नाईकवाडी, आंबडपाल) यांचे भजन आणि रात्री ९:३० वाजता गरबा नृत्याचा कार्यक्रम रंगेल. १२ ऑक्टोबरला सायंकाळी ८:०० वाजता श्री देवी भद्रकाली प्रासादिक भजन मंडळ (सावंतवाडा नं. १, आंबडपाल - बुवा आनंद सावंत), रात्री ९:०० वाजता भालचंद्र सोहष प्रासादिक भजन मंडळ (कुडाळ - बुवा महेश वेंगुर्लेकर) यांचे भजन व रात्री १०:३० वाजता गरबा नृत्य होईल. १३ ऑक्टोबरला सायंकाळी ७:०० वाजता नृसिंह प्रासादिक भजन (लक्ष्मीवाडी, कुडाळ - बुवा गणेश मेस्त्री), रात्री ९:३० वाजता भावई प्रासादिक भजन मंडळ (झाराप - बुवा प्रशांत बोभाटे) यांचे भजन व रात्री १०:३० वाजता गरबा रंगणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता कालिका प्रासादिक भजन मंडळ (सावंतवाडा नं. २, आंबडपाल - बुवा अविराज सावंत), रात्री ८:३० वाजता श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ (चव्हाणवाडी, आंबडपाल - बुवा धीरेंद्र चव्हाण) यांचे भजन आणि रात्री १०:३० वाजता गरबा नृत्य आयोजित केले आहे. १५ ऑक्टोबरला सायंकाळी ८:०० वाजता श्री वेतोबा महापुरुष प्रासादिक महिला भजन मंडळ (शेलटेवाडी, पावशी - बुवा राजलक्ष्मी शेलटे), रात्री ९:०० वाजता ओमकार प्रासादिक भजन मंडळ (सावंतवाडा नं. १, आंबडपाल - बुवा सहिल सावंत) यांचे भजन आणि रात्री १०:०० वाजता श्री गिरामाऊली देवी महिला मंडळ (नाईकवाडी, आंबडपाल) यांच्या फुगडीचा कार्यक्रम होईल.  उत्सवाच्या सहाव्या दिवशी, १६ ऑक्टोबरला सायंकाळी ८:३० वाजता श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ (मुळदे - बुवा प्रकाश पालव) यांचे भजन व रात्री १०:०० वाजता लहान मुलांचे खेळ खेळवले जातील. १७ ऑक्टोबरला सायंकाळी ८:०० वाजता श्री देवी भद्रकाली प्रासादिक भजन मंडळ (सावंतवाडा नं. १, आंबडपाल - बुवा प्रसाद सावंत), रात्री ९:०० वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ (खुटवळवाडी, तुळसुली - बुवा आनंद कानडे) यांचे भजन आणि रात्री १०:३० वाजता गरबा नृत्य होईल. १८ ऑक्टोबरला सायंकाळी ८:३० वाजता कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ (केसरकरवाडी, पावशी - बुवा साईश केसरकर) यांचे भजन व रात्री १०:०० वाजता मुलांचा रेकॉर्ड डान्स आयोजित केला आहे. १९ ऑक्टोबरला रात्री ९:०० वाजता श्री देवी गिरामाऊली प्रासादिक भजन मंडळाचे भजन आणि रात्री ९:३० वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ (कवठी) यांचा ‘श्री ब्रम्हपरमेश्वरी’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. उत्सवाच्या शेवटी, विजयादशमीच्या (दसरा) दिवशी २० ऑक्टोबरला सायंकाळी ८:०० वाजता आरती आणि रात्री ८:३० वाजता मुलांचे खेळ व दांडिया नृत्याने उत्सवाची सांगता होईल. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी व ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.