'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' मध्ये अणसूर ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम
वेंगुर्ले
'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत अणसूर ने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे यश अणसूरच्या सामूहिक एकतेचे आणि कष्टाचे फळ आहे. अशी माहिती सरपंच सत्यविजय गावडे यांनी दिली.अणसूर ग्रामपंचायतला या मोहिमेत गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार अधिकारी व पंचायत समितीचे सर्व वरिष्ठ अधिकारी. तसेच ग्रामपंचायत अधिकारी, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, केंद्र चालक, शिक्षक वर्ग, आरोग्य, महसूल व कृषी विभाग, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गट (CRP) आणि डिजिटल सहकार्य करणारे तरुण मित्र तन्वी, चिन्या, सिद्धेश गावडे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकसहभाग व लोकवर्गणीतून मदत करणारे आणि प्रशासनाला खंबीर साथ देणारे अणसूर गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या अखंड सहकार्यामुळेच हा बहुमान मिळाला आहे, असेही सरपंच श्री. गावडे यांनी सांगितले. हे समृद्धीचे पाऊल असेच यापुढे चालत राहील. अणसूर ग्रामपंचायत ला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आम्ही ग्रामपंचायत च्या वतीने आभारी आहेत असे ही श्री. गावडे यांनी सांगितले.
konkansamwad 
