करूळ घाटात कोसळलेली दरड हटविण्यात प्रशासनाला यश...

करूळ घाटात कोसळलेली दरड हटविण्यात प्रशासनाला यश...

करूळ

 

       मुसळधार पावसामुळे करूळ घाटात कोसळलेली दरड तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. दरड बाजूला केल्यानंतर घाटमार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दोन तास वाहतूक ठप्प राहिल्याने वाहनचालक व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.घाटमार्ग बंद झाल्याची माहिती मिळताच सभापती सिद्धेश रावराणे, तहसीलदार सूर्यकांत पाटील, सहाय्यक अभियंता पवन पाटील तसेच पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटात मोठी दरड कोसळून घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून मार्ग मोकळा करण्यात आला आणि एकेरी वाहतुकीस सुरुवात करण्यात आली.सध्या संबंधित यंत्रणेकडून जेसीबीच्या सहाय्याने उर्वरित माती व दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहनचालकांनी घाटातून जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.