झाड पडल्यामुळे आंबोलीत विस्कळीत झालेली वाहतूक वनविभागाच्या तत्परतेमुळे सुरळीत
आंबोली
आंबोली घाटात नाना पाणी पॉइंटपासून सुमारे २०० मीटर अंतरावर झाड पडल्याने आज सकाळी वाहतूक सुमारे एक तास बंद होती.साखळी क्रमांक ३१/९७९ येथे झाड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक थांबली होती. याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या जलद प्रतिसाद पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पडलेले झाड बाजूला केले.त्यामुळे सकाळी ९.४५ वाजता वाहतूक पूर्ववत करण्यात आली.सध्या आंबोली घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांनी दिली.
konkansamwad 
