वेंगुर्लेत ८ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

वेंगुर्लेत ८ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

 

वेंगुर्ला 


       जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून धन्वंतरी क्लिनिक, जनसेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर, कुडाळ व राजस्थान औषधालय यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्चला धन्वंतरी आयुर्वेदिक क्लिनिक, पहिला मजला, आशीर्वाद अपार्टमेंट, रहाटाच्या विहिरीनजिक, वेंगुर्ला येथे महिला व पुरूष रूग्णांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.सकाळी १० ते दुपारी ३ या वेळात आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. सई लिंगवत, डॉ. स्नेहा नवार, डॉ. धनश्री हिरेमठ, होमिओपॅथिक तज्ञ डॉ. संजीव लिंगवत हे सांधेदुखी, गुडघेदुखी, संधीवात, मधुमेह, स्त्रीरोग समस्या, वांझपणा आदी आजारांवर मोफत आरोग्य तपासणी करून मोफत सल्ला व औषधौपचार करणार आहेत. गरजू रुग्णांनी ९४०३५६०८०५ किंवा ९४२१२६८२६८ यावर नाव नोंदणी करावी.