महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 4 जून रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह सिंधुदुर्ग येथे आगमन व मुक्काम, गुरुवार दि. 5 जून रोजी सकाळी 11 ते 12 वाजता जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रांताधिकारी यांच्या समवेत वैश्यवाणी, शैव गुरव, भाविक गुरव, घाडी गुरव जात समुहाबाबत बैठक (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग) दुपारी 12 ते 1 वाजता जिल्ह्यातील वैश्यवाणी, भाविक गुरव, शैव गुरुव, घाडी गुरुव या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व सुनावणी (जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह), दुपारी 1.15 राखीव, दुपारी 2 ते 6 वाजता वैश्यवाणी, भाविक गुरव, शैव गुरव, घाडी गुरव जात समुहांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्षेत्रपहाणी, सायं. 7 वाजता शासकीय विश्रामगृह सिंधुदुर्ग येथे आगमन व मुक्काम, शुक्रवार दि. ६ जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता पुणेकडे रवाना.