दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्षपदी दीपक गवस यांची निवड

दोडामार्ग
दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्ष पदी दीपक गवस यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. निवडणूक पक्ष निरीक्षक महेश सारंग व मंदार कल्याणकर यांनी या नावाची घोषणा केली. त्यांनतर नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष म्हणाले, भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढविण्यासाठी मेहनत घेऊन तालुक्यातील प्रत्येक घराघरात भाजपचा झेंडा लावण्याचे काम सर्वांना सोबत घेऊन शत प्रतिशत भाजपासाठी आपले प्रयत्न असणार आहे भाजपा पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्या आदेशानुसार वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्ष दिपक गवस यांनी स्पष्ट केले आहे. भाजप तालुकाध्यक्ष निवड भाजपा संपर्क कार्यालय येथे पक्ष निरीक्षक महेश सारंग व मंदार कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी जेष्ठ पदाधिकारी तथा माजी जिल्हाप्रमुख विजय कुमार मराठे, माजी जिप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक संतोष नानचे, शहर प्रमुख राजेश फुलारी, चंदू मळीक, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पराशर सावंत, वैभव इनामदार, संजय सातार्डेकर, समीर रेडकर, सुधीर पनवेलकर, महिला तालुकाध्यक्ष दिक्षा महालकर, नगरसेविका संध्या प्रसादी, आकांक्षा शेटकर, देवेंद्र शेटकर, सुनील गवस, सुमित म्हाडगूत, संतोष नाईक, अजय दळवी आदी उपस्थित होते.