महिलांना एनसीएमसी कार्डसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

महिलांना एनसीएमसी कार्डसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई 

   एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत महिलांना स्मार्ट कार्डशिवायही एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ग्रामीण भागातील अनेक महिलांची कार्ड नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. त्यामुळे महिलांनी मुदत संपण्यापूर्वी एनसीएमसी कार्ड नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.