रेडीत 'नमो नेत्र संजीवनी' अभियानांतर्गत लाभार्थ्यांना मोफत चष्मा वाटप
रेडी
भाजपच्या सेवा पंधरवडा निमित्त आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या "नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान" अंतर्गत रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत चष्मा वाटप करण्यात आले.सप्टेंबर 2025 मध्ये रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्रपेढी जिल्हा रुग्णालय ओरोस आणि रेडी जिल्हा परिषद भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले होते. त्या शिबिरातील लाभार्थ्यांचे चष्मे उपलब्ध झाल्यानंतर सोमवार 4 ऑगस्ट 2026 रोजी रेडी भाजपच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.या कार्यक्रमावेळी एस.एस.पी. मेडिकल कॉलेज ओरोसच्या अधिकाऱ्यांनी वेंगुर्ला येथे होणाऱ्या आरोग्य शिबिराची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे यांनी केले. "नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान" या विषयावर तालुकाध्यक्ष विष्णू परब आणि जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी केले.यावेळी वेंगुर्ला खरेदी-विक्री संघाचे चेअरमन केळजी, पाल अणसूरचे भाजप पदाधिकारी कमलेश गावडे, रेडी सरपंच रामसिंग राणे, माजी उपसरपंच सौ. नमिता नागोळकर, जिल्हा मच्छीमार सेल प्रमुख वसंत तांडेल, रेडी शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, रेडी गाव अध्यक्ष ज्ञानेश्वर केरकर, रेडी 87 बूथ अध्यक्ष अरुण राणे, शिरोडा भाजप युवा नेतृत्व संतोष धानजी आदी मान्यवर उपस्थित होते.
konkansamwad 
