शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्ग, दि. २१
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी रिक्त जागांवर मोफत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.इच्छुक विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. वसतिगृहात मोफत प्रवेश, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.जिल्ह्यात मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड येथे मुलींची, तर मालवण, कणकवली व वेंगुर्ला येथे मुलांची शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहात सादर करावी.विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण संतोष चिकणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२३६२-२२८८८२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
konkansamwad 
