ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन....OBC, VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार
सिंधुदुर्ग, दि. २२
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) उच्च शिक्षण घेणाऱ्या, मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्यास मान्यता दिली आहे.या योजनेअंतर्गत १२ वी नंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे जमा करावी.पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करून ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा’ लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
konkansamwad 
