जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी सन २०२३-२४ कालावधीचे लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचे आवाहन.

जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी सन २०२३-२४ कालावधीचे लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

    जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी सन २०२३-२४ अखेरील लेखापरीक्षण विहित मुदतीत पुर्ण करुन,लेखापरीक्षण अहवाल निबंधक कार्यालयास सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था माणिक सांगळे यांनी केले आहे.
   महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९३० व नियम १९६१ अन्वये नोंदणीकृत झालेल्या सर्व सहकारी संस्थांनी या अधिनिधमातील कलम ७९ (१अ) अन्वये प्रत्येक वित्तीय वर्ष समाप्त होण्याच्या सहा महिन्यांच्या आंत (म्हणजेच ३० सप्टेंबर पूर्वी) कलमात नमुद केलेली लेखापरीक्षण अहवालासह (क) ते (च) ही विवरणपत्रे संबंधित निबंधकाकडे दाखल करणे अनिवार्य आहे.
   तसेच कलम ७५ प्रमाणे विहित मुदतीत संस्थेची अधिमंडळाची वार्षीक बैठक आयोजित करण्यात यावी व कलम ७९ (१ब) अन्वये संस्थेने आपले वार्षिक बैठकीचे दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत बैठकीत सर्व संम्मतीने, राज्य शासनाने मान्यता दिलेल्या नामतालीकेमधून लेखपरीक्षणाकरीता लेखापरीक्षक नेमणुकी संबंधी केलेला ठराव व संबंधीत लेखापरीक्षक यांचे त्याबाबतचे संमतीपत्र संबंधित निबंधकाकडे दाखल करावयाचे आहे.
   याव्दारे सन २०२४-२५ या वर्षासाठी लेखापरीक्षक नेमणुकीचे ठराव व संबंधित लेखापरीक्षक यांचे बाबत संमत्तीपत्र दि. ३१/१०/ २०२४ पूर्वी संबंधित संस्थेचे निबंधक यांच्या कार्यालयात पोहोच करावेत. ज्या संस्थांकडून विहित मुदतीत लेखापरीक्षण नेमणुकीचे ठराव लेखापरीक्षक यांचे संमत्तीपत्र प्राप्त होणार नाहीत, अशा संस्थांवर कायद्यातील तरतुदीनुसार सन २०२४-२५ चे लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती आदेश निर्गमीत करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तरी सहकारी कायद्यातील तरतुदीचे सर्व सहकारी संस्थांनी काटेकोरपणे पालन करावे.