कळसुलकर प्राथमिक शाळेच्या पालक संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.....शाळेच्या विकासासाठी पालक-शिक्षक-संस्था एकत्र
सावंतवाडी
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर प्राथमिक शाळेच्या पालक संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच शाळेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई होते. यावेळी सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, संचालिका राजश्री टिपणीस, संचालक अण्णा म्हापसेकर, मुख्याध्यापक प्रदीप सावंत तसेच विविध समित्यांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत करून कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी विविध समित्यांवरील रिक्त पदांसाठी सदस्यांची पुनर्रचना करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी, विविध उपक्रमांविषयी आणि नवीन अभ्यासक्रमाविषयी पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली. अध्यक्षीय भाषणात शैलेश पई म्हणाले, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक हे शाळेचे महत्त्वाचे घटक आहेत. शाळेच्या सर्व पायाभूत सुविधांसाठी संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. येणाऱ्या काळात शाळेचा आणखी विकास करण्याचा संस्थेचा मानस आहे. पालकांनीही शाळेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत सकारात्मक सूचना मांडल्या. मुख्याध्यापक प्रदीप सावंत यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सभेचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ मॅडम यांनी केले. हसत-खेळत आणि चर्चात्मक वातावरणात सभेची सांगता झाली.
konkansamwad 
