सीरियामध्ये बॉम्बस्फोटात १५ ठार

सीरियामध्ये बॉम्बस्फोटात १५ ठार


        उत्तर सीरियामधील मनबिज शहराच्या बाहेरील भागात कारमध्ये भीषण स्फोट झाला. यामध्ये १५ जण ठार झाले असून, १२ हून अधिक जण जखमी झाले आहे. बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १४ महिलांचा समावेश आहे.मनबिज शहराच्या बाहेरील भागात कारचा स्फोट झाला. दरम्यान शेती कामगारांना घेऊन जाणाऱ्या गाडीला या स्फोटाचा तडाखा बसला. यामध्ये १४ महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. इतर १५ महिला जखमी झाल्या, त्यापैकी काही गंभीर आहेत. तथापि, ब्रिटनस्थित युद्ध निरीक्षण करणाऱ्या सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने म्हटले आहे की १८ महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. अद्याप या दहशतावदी हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मागील ३ दिवसातील सीरीयामधील हा दुसरा बॉम्बस्फोट आहे. शनिवारी मनबिजच्या मध्यभागी झालेल्या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला होता.