शिरोड्यात हनुमान जन्मोत्सवाचा भव्य सोहळा.....भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शिरोड्यात हनुमान जन्मोत्सवाचा भव्य सोहळा.....भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शिरोडा

 

     चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शिरोडा येथील श्री मारुती देवस्थानात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार, दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी हा सोहळा पार पडणार असून, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत पूजा व धार्मिक विधींनी होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत लघुरुद्राचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक भाविकांकडून भजन सादर होणार असून, रात्री १० वाजता विशेष आकर्षण म्हणून वेंगुर्ला येथील रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाकडून रंगतदार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मारुती देवस्थान समिती, शिरोडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.