सावंतवाडीत नैसर्गिक पर्यायवरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग तर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा.

सावंतवाडीत नैसर्गिक पर्यायवरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग तर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा.

सावंतवाडी.

   निसर्गाच्या संवर्धनासाठी निसर्गाचा समतोल राखला जाणे गरजेचे आहे.आज संपूर्ण जगात जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी फक्त झाडे लावणे हा एकच उद्देश नसून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राण्यांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो.
    त्याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवार दि २८ जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावात एक बिबट्या वाघ भक्ष्याच्या शोधात पहाटेला येथील शेतकरी उमेश कवठणकर यांच्या विहिरीत पडला.यावेळी येथील जागरूक व पर्यावरणप्रेमी ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत  माहिती दिली.
    वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोचले व येथील ग्रामस्थांच्या मदतीने अथक परिश्रम घेऊन त्या बिबट्या वाघाला सुखरूप विहिरीतून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली. विशेष म्हणजे आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन आणि त्याच दिवशी ही पर्यावरणामधील एक महत्त्वाचा घटक बिबट्या वाघाला जीवदान देण्यासारखे महत्वपूर्ण कार्य बजावणाऱ्या उपवनसंरक्षक स बा सोनवडेकर,उपवनसंरक्षक सुनील लाड,मदन क्षीरसागर,वनरक्षक चंद्रकांत पडते, राजाराम राणे, प्रताप कोळी, सौ सहना दडमणी, राजेंद्र गावडे यांना वृक्ष देऊन गौरविण्यात आले.
    यावेळी नैसर्गिक पर्यायवरण व मानवता विकास संस्थेचे जोवेल डीसिल्व्हा कोकण विभाग सल्लागार, डॉ सोनल लेले जिल्हा महिला संघटक,संजय पिळणकर जिल्हा संघटक आदी उपस्थित होते.