राधारंग फाउंडेशनची ‘RRF हाफ मॅरेथॉन’ १ फेब्रुवारीला

राधारंग फाउंडेशनची ‘RRF हाफ मॅरेथॉन’ १ फेब्रुवारीला

 

परुळे

 

        राधारंग फाउंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी हाफ मॅरेथॉन यंदा १ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी पार पडणार आहे. यंदाचे हे पाचवे वर्ष असून ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा तीन गटांत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कोणत्याही वयोगटातील स्त्री–पुरुषांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार असून, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर सर्व सहभागींना टी-शर्ट दिला जाणार आहे. निवडलेले अंतर पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना मेडल्स प्रदान करण्यात येणार आहेत.मॅरेथॉनदरम्यान पाणी, ओआरएस, फळे, अल्पोपहार, वैद्यकीय मदत, प्रशिक्षित स्टाफ, दोन अँब्युलन्स तसेच गरजेनुसार फिजिओथेरपी सेवा उपलब्ध राहणार आहे. ही मॅरेथॉन परुळे हायस्कूल येथून सुरू होणार आहे.

प्रवेश शुल्क 
५ किमी – रु. २००
१० किमी – रु. ३००
२१ किमी – रु. ५००

    अधिक माहितीसाठी गोपाळ राऊळ  8010468565 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. २० जानेवारी २०२६ पूर्वी प्रवेश फी भरून ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांनाच सहभागाची संधी दिली जाणार आहे.