सिंधुदुर्गातील तरुण तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी

सिंधुदुर्गातील तरुण तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी

 

▪️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील लिपिक व श्रेणीतील 73 पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची सुरुवात :  05/09/2025

 अर्ज करण्याची शेवटची तारीख :  30/09/2025

ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख :  30/09/2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत

अर्जाची पद्धत :

▪️फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ :  www.sindhudurgdcc.com

अटी व नियम :

उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक.

डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्यक.

ऑनलाईन अर्ज व शुल्क (Non Refundable) भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक तयार ठेवणे आवश्यक.

अधिक माहिती व सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध आहे : www.sindhudurgdcc.com

✒️ नोंद : भरतीसंबंधी सर्व निर्णय बँकेचा अंतिम व बंधनकारक राहील.

प्रमुख कार्यकारी अधिकारी
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग