गोठोस धनगरवाडी येथे आज दशावतारी नाटक
कुडाळ
गोठोस धनगरवाडी येथील युवा मित्र मंडळ गोठोस, धनगरवाडी यांच्यावतीने समाज मंदिर, गोठोस येथे जय हनुमान दशावतारी नाट्य मंडळ आरोस, दांडेली यांचा महान पौराणिक दशावतारी नाट्य प्रयोग आज रात्री ९.०० वाजता आयोजित केला आहे. यावेळी युवा मित्र मंडळ, गोठोस यांच्यावतीने समाजातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा तसेच जेष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भव्य सत्कार कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा तथा दशावतारी नाट्यप्रयोगाचा पंचक्रोशीतील नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा मित्र मंडळ गोठोस, धनगरवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

konkansamwad 
