देवगड शहरात धक्कादायक घटना...दोन पर्यटकांनी एका लॉजवर गळफास घेऊन केली आत्महत्या
देवगड
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देवगड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोव्याहून देवगड येथे फिरण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांनी एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकाच खोलीत थांबलेल्या महिला आणि पुरुषाने एकाच दोरीला दोन बाजूंनी गळफास घेतल्याचे आढळून आले. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लॉजच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला आणि बेल वाजवली, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ दरवाजा उघडला जात नसल्याने कर्मचाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता, हा प्रकार उघडकीस आला.या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव आणि देवगडचे पोलीस निरीक्षक भालेराव उपस्थित होते. या पर्यटकांनी हे टोकाचे पाऊल नेमके कधी आणि कोणत्या कारणास्तव उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

konkansamwad 
