वेंगुर्ले येथे विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने गायीचा मृत्यू

वेंगुर्ले
वेंगुर्ला कॅम्प शासकीय गोदामाच्या पाठीमागे विजेच्या तारा खाली पडल्या होत्या. या विद्युत तारा मधून विद्युत पुरवठा चालू होता. घाडीवाडा येथील आना घाडी यांची गाभण गाय तिचा या विद्युत तारांना स्पर्श झाल्यामुळे ती मृत्यूमुखी पडली. या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. जर त्या तारा ना स्पेसर बसवला असता तर ही दुर्दैवी घटना घडली नसती. याला वीज वितरण कंपनी यांचा बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी संबंधित शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी व असे प्रकार होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील डूबळे यांनी केली आहे.