आजगावात बीएसएनएल नेटवर्क कोलमडले; ग्राहक हैराण

आजगावात बीएसएनएल नेटवर्क कोलमडले;  ग्राहक हैराण

 

आजगाव

 

     आजगाव परिसरातील प्रसिद्ध वेतोबा मंदिराजवळील बीएसएनएल मोबाईल टॉवर अचानक बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉल ड्रॉप, नेटवर्क गायब होणे, इंटरनेट वेग अत्यंत कमी अशा समस्या सातत्याने जाणवत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
       बीएसएनएलकडून 5G सेवेकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगितले जात असतानाच, मूलभूत 2G नेटवर्कही नीट उपलब्ध न राहणे हे ग्राहकांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. महत्त्वाच्या श्रद्धास्थानाच्या परिसरातही नेटवर्क नसल्याने पर्यटक आणि ग्रामस्थ दोघेही अडचणीत आले आहेत.
         स्थानिक नागरिकांनी कंपनीने टॉवरकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली असून, तातडीने नेटवर्क सुरळीत करून सेवा पूर्ववत करण्याची मागणी बीएसएनएल प्रशासनाकडे केली आहे.