खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार मनीष दळवींची निवडणुकीतून माघार

खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार मनीष दळवींची निवडणुकीतून माघार

 

वेंगुर्ले

 

       सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे सच्चा कार्यकर्ता या नात्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे काम करण्यासाठी आपण खासदार नारायण राणे यांच्या आदेश स्वीकारले असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले. वेंगुर्ले तालुक्यात आडेली जिल्हा परिषद मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदारसंघात एकूण दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मनीष दळवी यांच्या सह आप्पा गावडे, विष्णू खानोलकर, ललित कुमारठाकूर, जनार्दन कुडाळकर, ओंकार नाईक व नित्यानंद शेणई यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. दरम्यान या ठिकाणी आता समिधा नाईक, उबाठाचे विजय नाईक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सखाराम उर्फ दादा सारंग यांच्यात लढत होणार आहे.