आरक्षित समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाबाबत ओबीसी महासंघ घेणार जिल्हाधिकारी यांची भेट.
कुडाळ.
सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग संस्थेची तातडीची सभा कुडाळ येथील राज हॉटेल शेजारील सुनील भोगटे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली. सदर बैठकीत आरक्षित समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली असून बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये या बैठकीत प्रामुख्याने आरक्षित समाज बांधवांवर अन्याय झालेल्या लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मंगेश ससाणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत झालेल्या चर्चे नंतर सिंधुदुर्ग जिल्हा आरक्षित समाज आज दिनांक २१ जुन रोजी दुपारी 3 वाजता लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मंगेश ससाणे यांच्या संदर्भात आणि 52℅ आरक्षीत समाज यांच्या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे. तेव्हा सर्व आरक्षित समाजाचे जिल्हाध्यक्ष, आरक्षित समाज बांधव यांनी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर आरक्षित समाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या ओरोस येथे बैठक होणार आहे.
यावेळी बैठकीला नितीन वाळके, ॲड.नंदन वेंगुर्लेकर, हेमंत उर्फ काका कुडाळकर, सुनील भोगटे, रमण वायंगणकर, गणेश बोर्डेकर, भरत आवळे, समील जळवी, साईनाथ आंबेरकर, महेश परुळेकर, गुरुदास तेली, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, राजू भोगटे उपस्थित होते.

konkansamwad 
