आंबोली नांगरतास येथे गवारेड्याची ट्रकला धडक; चालक जखमी.
सावंतवाडी.
नांगरतास येथे गवा रेड्याने ट्रक चालकाला धडक दिल्यामुळे गाडी बाजूच्या गटारात कलंडल्याचा प्रकार घडला. यात विजय बहादुर संतराम (वय ३६, रा.उत्तर प्रदेश) हा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. गाडी गटारात कलंडल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याठिकाणी पोलीस हवालदार दीपक शिंदे, एस पी पिरणकर, अभिजित कांबळे यानी जाऊन जखमीला आरोग्य केंद्रात आणून त्यावर उपचार डॉक्टरांनी केल्यानंतर पोलिसांनी जबाब लिहून घेतला.

konkansamwad 
