म्हापण येथे भाजपची रणनिती बैठक;.....'प्रत्येक मतदारसंघात उमेदवार विजयी झाला पाहिजे'— मनीष दळवी

म्हापण येथे भाजपची रणनिती बैठक;.....'प्रत्येक मतदारसंघात उमेदवार विजयी झाला पाहिजे'— मनीष दळवी

 

परुळे


       आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण रणनिती बैठक पार पडली. ही बैठक म्हापण येथील सिद्धी गेस्ट हाऊस येथे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते घेण्यात आली.
        या बैठकीत दळवी यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत भाजपचा झेंडा प्रत्येक मतदारसंघात फडकवण्याचे आवाहन केले. “आपापसातील मतभेद बाजूला ठेवून पक्षवाढीसाठी एकदिलाने काम करा. पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा उमेदवार प्रत्येक ठिकाणी विजयी झाला पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
      बैठकीदरम्यान निवडणुकीची रणनिती, संघटनात्मक बळकटी आणि स्थानिक पातळीवरील प्रचार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
        यावेळी माजी जि.प. सदस्या वंदना किनळेकर, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पप्पू परब, माजी सभापती निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, माजी सरपंच गुरुनाथ मडवळ, तसेच आप्पी फणसेकर, आनंद गावडे, प्रणिती आंबडपालकर, संजय दूधवडकर, सुरेश ठाकूर, सुदेश किनावडेकर, गुरुनाथ चव्हाण यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.