वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर वार्षिक जत्रौत्सव १५ नोव्हेंबरला

वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर वार्षिक जत्रौत्सव १५ नोव्हेंबरला

 

वेंगुर्ला


        ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार, दि. १५ नोव्हेंबरला उत्साहात संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, केळी-नारळ ठेवणे, रात्रौ १० वा. तरंगदेवता व श्री सातेरी पालखीच्या आगमन झाल्यावर श्री रामेश्वर, श्री नागनाथ-भगवती, श्री गणपती-दत्त व लालखी यांची मंदिराला प्रदक्षिणा, त्यानंतर वालावलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी जत्रौत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.