राष्ट्रीय परिषदेसाठी कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांची निवड
कुडाळ
दिल्ली येथे होणाऱ्या शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. ३ व ४ जुलै रोजी ही परिषद होणार असून राष्ट्रीय स्तरावर शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांसाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून राज्य आणि संघराज्य प्रदेशामधील संस्थांसाठी ही परिषद आहे. संविधानिक बळकटीकरणात शहरी संस्थांची भूमिका तसेच लोकशाही आणि राष्ट्र उभारणी या विषयांवर ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी सौ. बांदेकर यांची निवड करण्यात आली असल्यामुळे बांदेकर यांचे सर्वांनी अभिनंदन केले.

konkansamwad 
