विलवडे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा उद्या जत्रोत्सव

विलवडे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा उद्या जत्रोत्सव

 

विलवडे

 

      विलवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त माऊलीच्या दर्शनासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची अलोट गर्दी होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम होणार. रात्री १२ वाजता मंदिराभोवती ढोलताशांच्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह पालखी मिरवणूकीनंतर मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे सर्व मानकरी आणि श्री देवी माऊली देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.