जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्या विहार इंग्लिश स्कूलचे यश

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्या विहार इंग्लिश स्कूलचे यश

 

सिंधुदुर्गनगरी


       ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विद्या विहार इंग्लिश स्कूल, आरोसच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
      कु. अक्षता धोंडू झोरे हिने ३ हजार मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदकाची मानकरी ठरली असून, तिची निवड आता रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. तर कु. अश्मि संतोष पिंगुळकर हिने तीन किलोमीटर चालण्यात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक प्राप्त केले आहे.
       या दोन्ही विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक श्री. निलेश देऊलकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष निलेश परब, उपाध्यक्ष महादेव पांगम, सचिव शांताराम गावडे, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.