शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि विक्रम काळे यांचा सन्मान

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि विक्रम काळे यांचा सन्मान

 

जालना

   
          महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळवून देण्यात कोकण विभागीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जोरदार प्रयत्न केले.व प्रयत्नांना यश आल्याने महाराष्ट्र शासनाने अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना वाढीव २०% वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेतला.यास्तव राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वतीने जालना येथे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व विक्रम काळे याचा जाहीर सत्कार करण्यात आला.त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत अंशतः अनुदानित शिक्षकांनी,शिक्षक समन्वय संघातर्फे भव्य सत्कार केला.दरम्यान सत्काराला उत्तर देताना राहिलेले टप्पे देखील अंशतः अनुदानित शिक्षकांना मिळवून देण्यास कटीबद्ध असल्याचे नमूद केले.शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सत्तेत असून देखील, वेळी शासनाशी भांडून अंशतः अनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून दिला.याची दखल, सर्वत्र महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षकांकडून घेतली जात आहे.दरम्यान् या सत्कार सोहळ्याला शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, आणि अंशतः अनुदानित शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.