सिंधुदुर्गात आरोग्य सेवांचा आढावा........सचिव विरेंद्र सिंह यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या उन्नतीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव व जिल्ह्याचे पालक सचिव विरेंद्र सिंह यांनी जिल्ह्यातील क्रिटिकल केअर ब्लॉक, आयुष इमारत आणि औषध भांडार स्थळांची पाहणी केली. त्यांनी बांधकाम कामे निर्धारित मुदतीत आणि उच्च दर्जात पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच, आयुष इमारत त्वरित कार्यान्वित करण्यासह आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत

konkansamwad 
