कुडाळ नगराध्यक्ष पदाची २४ जानेवारीला निवडणूक

कुडाळ नगराध्यक्ष पदाची २४ जानेवारीला निवडणूक


कुडाळ 
    कुडाळ नगरपंचायत येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया २४ जानेवारीला होणार आहे. याबाबतचा निवडणुक कार्यक्रम जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जाहीर केला आहे. नगराध्यक्षा सौ. अक्षता खटावकर यांनी नुकताच नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर नगराध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यामुळे या नगराध्यक्षपदाचा निवड कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर कला आहे. यात २० तारखेला दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करणे आवश्यक आहे.