तरुणीचा बॅडमिंटन पंच बनण्यापर्यंतचा प्रवास....... सबा शेखचे प्रेरणादायी यश!
वेंगुर्ला
गोवा राज्य बॅडमिंटन असोसिएशनतर्फे नुकतीच घेण्यात आलेल्या राज्य बॅडमिंटन पंच परीक्षेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सबा अब्दुलकरीम शेख (द्वितीय वर्ष विज्ञान) हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी व संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी क्रिडा संचालक प्रा. जे. वाय. नाईक, जिमखाना चेअरमन डॉ. कमलेश कांबळे, प्रा. संजय चमणकर, प्रा. एस. जी. चुकेवाड, प्रा. एल. बी. नैताम, डॉ. एस. एस. भिसे उपस्थित होते.
सबा शेख हिला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे देसाई, पेट्रॉन कौन्सिल मेंबर श्री. दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी श्री. पृथ्वी मोरे, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
या यशामुळे खर्डेकर महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

konkansamwad 
