मालवणात शिंदे गटाची लाट — शिवसेनेत मोठे इनकमिंग!
मालवण
मालवण शहरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत उ. बा. ठा. गटातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुका समन्वयक पुनम चव्हाण, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, माजी नगरसेविका निना उंबरकर, शाखाप्रमुख मोहन मराळ, दीगंबर बगाड, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चव्हाण, वेदांत चव्हाण, ऋत्विक चव्हाण, नागेश चव्हाण आणि असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून शिवसेना (शिंदे गट) ची ताकद वाढवली आहे.
कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि आमदार निलेश राणे यांच्या विकास कामांवर विश्वास व्यक्त करत नव्या उर्जेने पक्षात प्रवेश केला.या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख राजा गावडे, महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, किसन मांजरेकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

konkansamwad 
