वेंगुर्ला येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ५१ प्रकरणे निकाली.

वेंगुर्ला येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ५१ प्रकरणे निकाली.

वेंगुर्ला.

  दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे दिनांक २७ जुलै रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वेंगुर्ला तालुक्यांतील दिवाणी कडील ०२ प्रकरणे, फौजदारी कडील १८ प्रकरणे, ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी, विवीध बँका व विध्युत विभाग, वेंगुर्ला यांच्याकडील एकुण ३१ वादपुर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यांत आली.
   यावेळी दिवाणी, फौजदारी व वादपुर्व प्रकरणांतील मिळून एकुण तेरा कोटी अठयांतर लाख सहा हजार सातशे त्र्याहात्तर मात्र एवढी रक्कम या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वसूल करण्यांत आली. तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार संघटना, वेंगुर्ला यांचे संयुक्त विदयमाने दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे शनिवार दिनांक २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यांत आले होते. तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला अध्यक्षा, तथा दिवाणी न्यायाधीश, श्री. डी. वाय. रायरीकर, वकिल श्रीम.पुनम नाईक, पॅनेल सदस्य, व पक्षकारांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन राष्टीय लोकअदालतीचे कामकाज सुरु करण्यांत आले. सदरच्या लोकअदालतीमध्ये पॅनेल प्रमुख म्हणून श्री. डी. वाय. रायरीकर, दिवाणी न्यायाधीश (क.स्तर), वेंगुर्ला, व पॅनेल सदस्य म्हणून ॲड. श्रीम. पुनम नाईक, यांनी काम पाहिले. सदरच्या लोकअदालतीच्या वेळी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक, श्रीम.एस.एस.कांबळे, व श्री. एस.के.खेडेकर, वकील वर्ग, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.