सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल यांनी विविध परिक्षेत आठवी मधून शिष्यवृत्ती पटकाविलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील तीन विद्यार्थिनींचा केला सत्कार.
वेंगुर्ला.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा असलेल्या मध्ये पाट हायस्कूल मधून ओबीसी कॅटेगरीतून जिल्ह्यात आठवी व स्कूल मधून चौथी आलेली युक्ती हळदणकर, नवभारत विद्यालय कोचरा शाळेमधून एस.टी.एस. परीक्षेत उत्तीर्ण झालेली इयत्ता तिसरीतील सई राऊळ व इयत्ता चौथीतून डॉक्टर अब्दुल कलाम परिक्षेत यश प्राप्त केलेल्या वेदश्री दाभोलकर या तिन्ही विद्यार्थ्यांनींचा वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सनदी अभियंता विवेक कुबल यांनी खास शालोपयोगी साहित्य,पारितोषिक व पुष्पगुच्छ देवून यांनी तिन्ही मुली या कोचरा भागात रहात असल्याने कोचरा येथील संतोष हळदणकर यांच्या घरी सत्कार कार्यक्रम केला.यावेळी विलास दळवी, नितीश कुडतरकर आदी उपस्थित होते.

konkansamwad 
