वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस
वैभववाडी
वैभववाडी तालुक्यात आज पहाटेपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. तर अंतिम टप्प्यात असलेली भात लावणीला चांगलाच जोर आला आहे. यावर्षी निर्धारित वेळेआधीच पाऊस बरसल्याने बळीराजा सुखावला आहे.

konkansamwad 
