डॉ. वसुधाज योगा ॲकॅडमी आणि लिनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

डॉ. वसुधाज योगा ॲकॅडमी आणि लिनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

 

वेंगुर्ला
 

          डॉ. वसुधाज योगा अँड फिटनेस ॲकॅडमी वेंगुर्ला आणि लिनेस क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. "Healthy Women Healthy Nation" हा उद्देश घेऊन प्रत्येक आरोग्यवान स्त्री ही समर्थ राष्ट्र निर्माणाचा पाया असते आणि पाया भक्कम तर राष्ट्र भक्कम. म्हणूनच प्रत्येक स्त्रीचे आरोग्य समर्थ, सुदृढ, सशक्त करण्यासाठी योग्य व्यायाम कसा करावा याचे मार्गदर्शन डॉ. वसुधा मोरे यांनी केले.या कार्यक्रमात डॉ.वसुधाज ॲकॅडमीचे सर्व साधक, सेक्रेटरी वृंदा मोर्डेकर, अनिता रेडकर, मयुरी बेहरे, नमिता खानोलकर, अनुजा धारगळकर, नीला यरनाळकर, स्वरा आचरेकर, मंदाकिणी सामंत, मोना नाईक, अश्विनी कुंडेकर,  आराधना कुंडेकर, बीना भाटिया, प्रतिक्षा बोवलेकर, नयना आडेकर, दर्शना मोचेमाडकर यांच्यासह लिनेस क्लब ऑफ  वेंगुर्ला अध्यक्ष पल्लवी कामत, कॅबिनेट ऑफीसर उर्मिला सावंत, खजिनदार कविता भाटिया यांनी सहभाग घेतला.याप्रसंगी  सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध डॉ.अम्रुता स्वार, कणकवली येथुन स्नेहा खानोलकर, जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील योगसाधक ऑनलाईन सहभागी झाले. या कार्यक्रमाला राम पोळजी आणि डॉ. प्रणव कामत यांनी विशेष सहकार्य केले. पोळजी यांनी गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन सर्व महिला वर्गाचा सन्मान केला.