कुडाळ शहरातील श्री देवी महालक्ष्मीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

कुडाळ शहरातील श्री देवी महालक्ष्मीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

 

कुडाळ

 

    कुडाळ शहरातील श्री देवी महालक्ष्मी वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा होणार आहे. यामध्ये विविध कार्यक्रम देखील होत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सकाळी 9 वाजल्यापासून श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरणे तसेच रात्री 11:30 वाजता पुराण वाचन व पालखी मिरवणूक. रात्री 1:00 वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा पौराणिक नाट्य प्रयोग व दहिकाला असे विविध कार्यक्रम श्री देवी महालक्ष्मी कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहेत.
         तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्री देवी महालक्ष्मीचे आशीर्वाद घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.