मनसेची स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी रणनीती बैठक कणकवलीत संपन्न
कणकवली
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवली–देवगड–वैभववाडी विधानसभा पदाधिकाऱ्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे पार पडली.या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व पक्षनिरीक्षक संदीप दादा दळवी तसेच कामगार सेना सरचिटणीस व पक्षनिरीक्षक गजानन राणे हे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत आगामी निवडणुका लढविणे आणि स्थानिक पातळीवर उमेदवार विजयी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी जिल्हा सचिव सचिन तावडे, उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री, वैभववाडी संपर्क अध्यक्ष चंद्रशेखर सावंत, मनविसे जिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे, कणकवली तालुका अध्यक्ष शांताराम सादये, देवगड तालुका अध्यक्ष संतोष मयेकर, देवगड उपतालुकाध्यक्ष राजन पवार, मनसे देवगड तालुका अध्यक्ष पप्पू जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

konkansamwad 
