सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा महाविकास आघाडीने केला निषेध
वैभववाडी
लोकशाहीच्या तिसऱ्या मुख्य स्तंभावरील गंभीर हल्ल्याचा आज वैभववाडीत महाविकास आघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यादरम्यान ॲड. शर्मा यांनी मुख्य न्यायमूर्ती न्या. भुषण गवई यांच्यावर चप्पल फेकल्याची घटना घडली होती.डॉ. बाळासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित या निषेधसभेत विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी या विकृत कृत्याची निंदा करत, त्या वकिलाची सनद कायमस्वरूपी रद्द करावी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.महाविकास आघाडीच्या तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, महिला नेते तसेच नगरसेवकांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
सुरेश नाईक म्हणाले, “ही प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत चालली आहे; ती येथे थांबवली पाहिजे. हा फक्त न्यायाधीशांवर नव्हे, तर बाबासाहेबांच्या संविधानावर झालेला हल्ला आहे.”

konkansamwad 
