वारकरी संप्रदायाचे पुरस्कार जाहीर.

कणकवली.
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायामार्फत गेली १० वर्षे वारकरी संप्रदायात चांगली कामगिरी करणाऱ्या वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, मृदंगमनी यांना मानाचा संतसेवा पुरस्कार दिले जातात. यावर्षी मानाचे हे पुरस्कार ह.भ.प. मदन रामचंद्र कुंदेकर कसई दोडामार्ग ह.भ.प. उत्तम बापू पेडणेकर शिरशिंगे सावंतवाडी यांना जाहीर करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा जिल्हा मेळावा रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी दोडामार्ग येथील सुशिला मंगल कार्यालयात जिल्हा अध्यक्ष मा.ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यावेळी हे मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत तरी जिल्ह्यातील वारकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजू राणे सचिव-सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.