ॲड.सुमित जाधव यांना 'संविधान रत्न' पुरस्काराने सन्मानित.
सिंधुदुर्ग.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, तळेगाव (ता. मावळ जि. पुणे) यांच्यावतीने दिला जाणारा संविधान रत्न' पुरस्कार मालवण- वायरी आडवण येथील अॅड.सुमित काशिनाथ जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, तळेगाव (ता. मावळ जि. पुणे) ही संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीचे शताब्दी वर्ष तसेच माता रमाईचे १२५ वे वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्त वकिली क्षेत्रात योगदान देणाऱ्या वकिलांचा वडगाव माळगाव येथे सन्मान करण्यात आला. मालवण-वायरी आडवण येथील ॲड. सुमित काशिनाथ जाधव यांना 'संविधान रत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड.रंजना भोसले, उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार तुकाराम मोरे, सचिव किसन थुल उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल ऍड सुमित जाधव यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

konkansamwad 
