अमेरिका अन् इस्रायलचा इराणवर हल्ला, राजधानीत अनेक स्फोट, सर्वोच्च नेत्याचं कार्यालय टार्गेटवर?

अमेरिका अन् इस्रायलचा इराणवर हल्ला, राजधानीत अनेक स्फोट, सर्वोच्च नेत्याचं कार्यालय टार्गेटवर?

 

तेहरान

 

    इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचे समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या कार्यालयाजवळही हल्ला करण्यात आला आहे. तेहरानवर किमान 3 इस्रायली हल्ले झाल्याची माहिती आहे. इस्रायलने आधीच आपल्या नागरिकांना इराणी क्षेपणास्त्रांबद्दल इशारा दिला आहे.शनिवारी सकाळी आयडीएफने इराणवर अचानक हल्ला केला. इराणी माध्यमांनी वृत्त दिले की तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. हल्ल्याच्या वेळी, आयडीएफने सर्व नागरिकांना सुरक्षित क्षेत्रांजवळ राहण्याचा राष्ट्रीय इशारा पाठवला. आयडीएफने म्हटले आहे की इस्रायलवर मिसाईल डागण्याची शक्यता असल्याने जनतेला तयार करण्यासाठी हा एक सक्रिय इशारा दिला आहे.   फार्स न्यूज एजन्सीनुसार, राजधानी तेहरानच्या युनिव्हर्सिटी स्ट्रीट आणि जोमहौरी भागात अनेक मिसाईल हल्ले करण्यात आले आहे. इराणकडून क्षेपणास्त्र डागण्याची शक्यता आहे. इराणमधून स्फोटांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इराणी माध्यमांनी वृत्त दिले आहे की इस्रायली सैन्याने इराणी लष्कराच्या आयआरजीसी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. मध्य तेहरानलाही लक्ष्य केले आहे. सध्या इस्रायलवर कोणत्याही क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे समोर आलेले नाही. इस्रायलने सर्वसामान्य नागरिकांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. हल्ला त्यावेळी करण्यात आला ज्यावेळी इराण आणि अमेरिका यांच्यात अणू कार्यक्रमावर चर्चा सुरू होती. गुरुवारी जिनेव्हा मधील कार्यक्रमात दोन्ही देशांमध्ये चर्चेचा तिसरा टप्पा पार पडला होता. शनिवारी चर्चेचा पुढचा टप्पा पार पडणार होता. दरम्यान सैन्य कारवाईमुळे राजनैतिक प्रयत्नांवर गंभीर प्रश्न निर्माण केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या अगोदर इराणला धोकादायक म्हटले होते. तर अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने शुक्रवारी दरम्यान, वाढत्या सुरक्षेच्या धोक्याचे कारण देत. शुक्रवारी इस्रायलमधून अनावश्यक दूतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यास परवानगी दिली. पश्चिम आशिया आधीच तणावपूर्व परिस्थितीचा सामना करत आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामुळ तेथील परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.