चारचाकीच्या धडकेत सावंतवाडीतील दोघे गंभीर; अपघातानंतर चारचाकी चालकाचे पलायन

चारचाकीच्या धडकेत सावंतवाडीतील दोघे गंभीर; अपघातानंतर चारचाकी चालकाचे पलायन

 

सावंतवाडी 

 

    मोपा विमानतळावरून आपली ड्युटी संपवून सावंतवाडीत घरी येताना काल सोमवारी रात्री माजगाव मुंबई - गोवा महामार्गावर मोटरसायकलस्वार संतोष नारायण सावंत (रा. कोलगाव, सावंतवाडी) आणि जोसेफ डिसोजा (रा. जुना बाजार, सावंतवाडी) या दोघांना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. कोलगाव येथील संतोष सावंत यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर डिसोजा यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असे सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस अधिकारी मनोज राऊत व श्री लोकरे अधिक तपास करत आहेत.